शहरातील काही भागाचा वीजपुरवठा राहणार बंद

Foto
महावितरणच्या बायजीपुरा उपकेंद्रातील रोहित्र बदलण्याच्या कामामुळे या उपकेंद्रातील वाहिन्यांवर असलेल्या वसाहतींचा वीजपुरवठा उद्या गुरुवार (१४ फेब्रुवारी) रोजी काही काळ बंद राहणार आहे.

या भागात राहणार बंद 
११ केव्ही रोशनगेट, ११ केव्ही मोंढा, ११ केव्ही वॉटर वर्क फिडरवरील निझामुद्दीन,  दर्गा रोड, चंपा चौक, मोंढा, जिन्सी, गंजेशाही, शहागंजचा काही भागाचा वीजपुरवठा फिडर सकाळी ६ ते दुपारी ४ या वेळेत बंद राहील. तर ३३ केव्ही सिडको फिडरवरील ३३/११ केव्ही रोशनगेट व ३३/११ केव्ही बायजीपुरा, वॉटर वर्क फिडरवरील संपूर्ण भाग सकाळी १० ते दुपारी 4 या वेळेत बंद राहील. वीजपुरवठा कामाच्या वेळेनुसार दिलेल्या वेळेपूर्वी किवा नंतर पूर्ववत होऊ शकतो. तरी ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

सध्या बायजीपुरा ३३/११ केव्ही उपकेंद्रात १० एमव्हीए क्षमतेचा जुना पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे. मात्र या ट्रान्सफॉर्मरमध्ये ऑईल गळती व तांत्रिक बिघाड होत असल्यामुळे अखंडित वीजपुरवठ्यात अडथळे येत होते. त्यामुळे महावितरणने हा ट्रान्सफॉर्मर बदलून त्या जागेवर याच क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम गुरुवारी करण्याचे नियोजन केले आहे. नवीन ट्रान्सफॉर्मर बसवल्यानंतर बायजीपुरा, शहा बाजार, राजाबाजार, चाऊस कॉलनी, कैसर कॉलनी, शहागंज, जाधवमंडी, जिन्सी, खास गेट, मोंढा, अहिंसानगर, मीना बाजार, नागसेन कॉलनी, अंगुरीबाग या परिसरात अखंडित व सुरळीत वीजपुरवठा राहण्यास मदत होणार आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker